गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जरांगे यांची पुन्हा फडणवीसांवर टीका…आता दिला हा इशारा

by Gautam Sancheti
जुलै 22, 2024 | 3:01 am
in संमिश्र वार्ता
0
manoj jarange e1706288769516

जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सत्तेसाठी माजोरडेपणा चालला आहे. गर्दी काय असते. मुंबईत दाखवतो, असा इशारा देताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. त्यावेळेस त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी मागणी मान्य होईपर्यंत उपोषणावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली.

जरांगे म्हणाले, की मराठ्यांच्या मुलांना त्रास झाला, की मला वेदना होतात. मी आ. प्रवीण दरेकर यांच्याबद्दल काहीच बोललो नव्हतो. दरेकर, प्रसाद लाड यांना मी भाऊच म्हणतो; मात्र महाराष्ट्राच्या लेकरांना प्रवेश घेताना अडचणी येत आहेत. त्याला भंपकपणा म्हणतात का? मराठ्यांच्या लेकरांच्या जागी तुमच्या समाजाचे लेकरे असतील, तर तुम्हाला कसे वाटले असते, असा सवाल त्यांनी केला. दरेकर यांनी मराठा समाजाच्या लेकरांचा अपमान केला. ते जनतेच्या नजरेतून पडले आहेत, असे जरांगे म्हणाले. तुम्ही मराठा समाजायच्या गर्दीला आव्हान देऊ नका, असे सांगून तुमच्यासारख्या नीच विचारांचा मी नाही, अशी टीका जरांगे यांनी केला. माझ्याकडून गर्दी हटली, म्हणून मी योजनेला नावे ठेवली नाहीत. गोरगरीब मराठ्यांच्या महिलांना योजनेचा लाभ देत असल्याचा दावा दरेकर यांनी केला असला, तरी मग त्याच महिलांच्या लेकरांची आरक्षणाची मागणी आहे. दरेकर यांनी ते आरक्षण द्यावे. ही योजना म्हणजे जत्रेत रेवड्या वाटण्यासारखे आहे, अशी टीका जरांगे यांनी केली.

या योजना म्हणजे निवडणुका समोर ठेवून चालवलेले नाटक आहे आणि ते फडणवीस घडवून आणले जात आहे. फडणवीस यांच्यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे काही चालत नाही. भाजपचे नेते फडणवीसांच्याच सांगण्यावरून बोलतात, अशी टीका करून ते म्हणाले, की दरेकर यांनी माझ्या विरोधात अभियान सुरू करणार असल्याचे सांगितले. मराठा क्रांती मोर्चा पडद्यामागून त्यांनीच संपवला. फडणवीसांसाठी तुम्ही काय करता हे सर्व माहीत आहे, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, जरांगे यांचा भंपकपणा आम्ही आता उघडा करणार असल्याचा इशारा दरेकर यांनी शनिवारी दिला होता. मी मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्र करून, गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून त्यांना हवे ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. जरांगे यांच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवावे लागेल. प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे, म्हणून ते लाडकी बहीण आणि भाऊ योजनेवर ते फुटकळ आरोप करत आहेत, असे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दगड पडून तीन भाविकांचा मृत्यू

Next Post

मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, की…!….अजितदादा या केकमुळे पुन्हा चर्चेत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 76

मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, की…!….अजितदादा या केकमुळे पुन्हा चर्चेत

ताज्या बातम्या

IMG 20250731 WA0002

पुरोहित संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची घेतली भेट…कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा

जुलै 31, 2025
cbi

घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर सीबीआयची मोठी कारवाई…४७ ठिकाणी छापे

जुलै 31, 2025
Untitled 60

मुंबईत ६ कोटी ५० लाखाची निकृष्ट दर्जाची चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

जुलै 31, 2025
crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011