इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीःदेशाची राजधानी दिल्लीतील मदर डेअरीच्या सफाल या किरकोळ स्टोअरमध्ये टोमॅटोचा भाव शंभर रुपये किलोवर पोहोचला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीत टोमॅटोचा भाव ९३ रुपये किलो आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, २० जुलै रोजी टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किंमत ७३.७६ रुपये प्रति किलो होती. गेल्या आठवड्यात किमतीत मोठी वाढ झाली असून, अतिउष्णता आणि अतिवृष्टीमुळे पुरवठा खंडित झाला आहे. अधिकाऱ्याने सांगितले, की दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये टोमॅटो, बटाटे आणि कांद्याचे भाव खूप जास्त आहेत. अति उष्णतेनंतर अतिवृष्टीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे किरकोळ किमतीत वाढ झाली. बटाटा आणि कांद्याचे भाव शनिवारी पश्चिम दिल्लीतील मदर डेअरी स्टोअरमध्ये कांदा ४६.९० रुपये किलो आणि बटाटा ४१.९० रुपये किलो दराने विकला जात होता. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीत कांदा ५० रुपये किलो आणि बटाटा ४० रुपये किलो दराने मिळतो.
कांद्याची अखिल भारतीय सरासरी किंमत ४४.१६ रुपये प्रति किलो आणि बटाट्याची सरासरी किंमत ३७.२२ रुपये प्रति किलो आहे. हिरव्या भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे.