इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सत्ताधाऱ्यांना जाहिरातीचा किती सोस आहे याचे अजून एक उदाहरण आहे. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिराती करतात. काम केलं असेल तर खुशाल जाहिरात करावी. परंतु खोटं बोलताना थोड भान ठेवायला हवं. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबीयांना किती मनस्ताप होत असेल? अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील नागरिकांच्या फोटोंचा अवैधपणे वापर करणे हा किती मोठा गुन्हा आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया वरून व्यक्तीचे फोटो डाऊनलोड करणे आणि परवानगी शिवाय जाहिरातीत वापरणे ही गंभीर बाब आहे. महायुतीच्या योजना जश्या पोकळ आहे, तश्याच जाहिराती सुद्धा पोकळ आहे. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावा.