मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप पाठोपाठ आता काँग्रेसनेही प्रवक्त्यांवर पत्रकार परिषदा आणि मीडिया बाईटची जबाबदारी दिली असून त्याची यादी प्रसिध्द केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून फेक नरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटी सेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हिडिओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहे. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने खालील नेते आणि प्रवक्त्यांवर पत्रकार परिषदा आणि मीडिया बाईटची जबाबदारी दिली आहे.