नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्क्रॅप मटेरियल खरेदी विक्री व्यवसायात एका कारखानदाराची कोट्यावधींची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन कंपन्यांच्या माध्यमातून खोट्या वजन पावत्या तयार करून भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत अरूण संगई (रा.सावरकरनगर,गंगापूररोड) या उद्योजकाने याबाबत फिर्याद दिली आहे. संगई यांचे अंबड औद्योगीक वसाहतीत तीन कारखाने असून गेल्या वीस वर्षात त्यांनी अभिषेक शर्मा यांच्या महाराष्ट्र वे ब्रिज, जानकी वे ब्रिज व इंडस्ट्रीयल वे ब्रिजच्या माध्यमातून स्क्रॅप मटेरियलची विक्री केली. या खरेदी विक्रीत संबधीतांनी खोट्या वजन पावत्या तयार करून संगई यांनी करोडो रूपयांची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.