नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन सावत्र मुलीवर लैगिक अत्याचार करणा-या नराधम बापास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना २०१८ मध्ये टागोरनगर भागात उघडकीस आली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे कोर्ट क्र.९ च्या न्या. श्रीमती व्ही.एस.मलकापट्टे – रेड्डी यांच्या कोर्टात चालला. सुनिल टिप्पा पंथीकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सावत्र पिता असलेला पंथीकर हा पत्नी कामावर गेली की दहा वर्षीय मुलीस धमकावित अत्याचार करीत होता. २०१८ मध्ये हा प्रकार समोर आल्याने त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक संध्या तेली यांनी करून पुराव्यानिशी दोघारोप न्यायालयात सादर केले होते.
हा खटला कोर्ट क्र.९ च्या न्या. श्रीमती व्ही.एस.मलकापट्टे – रेड्डी यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने पीडिता साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस बलत्काराच्या कलमान्वये जन्मठेप व वीस हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या खटल्यात पीडितेची आई फितूर झाली होती.