इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नीट परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर अखेर आज NEET UG 2024 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला बसलेल्या २३ लाखांहून अधिक विद्यार्थी परिक्षेला बसले होते. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला परीक्षा शहर आणि केंद्रनिहाय बसलेल्या सर्व उमेदवारांचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.
NTA वेबसाइटवर निकाल हा अपलोड करण्यात आला आहे. xams.nta.ac.in/NEET/ साईटवर जाऊन यूजी 2024 रिजल्ट क्लिक केल्यानंतर
येथे परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर स्कोरकार्ड बघायला मिळेल. निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर पुढे काय होणार हे स्पष्ट होईल. परीक्षा शहर आणि केंद्रनिहाय निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी अंतिम निर्णय देऊ शकते.