इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे, वंचित असा प्रवास करुन शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांचे भाचे प्रतिक कोडितकर यांना आला. हा फोन रेकॅार्ड करण्यात आला आहे.
या धमकीच्या फोननंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केलाय की अगदी मनसे वाले माझी मर्डर करण्यापर्यंत गेले…? संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे मागणी केली आहे…पाहू पोलिस आता यावर काय भुमिका घेतात…