इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नृत्यांगना गौतमी पाटीलवर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल, असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला परवाणगी सुध्दा पोलिसांनी न दिल्याचेही बोलले जात आहे.
गौतमी पाटीलबरोबरच तीचे स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे ,हर्षल किशोर भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान गौतमी पाटील हिचा कोल्हापुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण येथे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर अहमदनगरमध्ये कार्यक्रम झाला. पण,तो अंगलट आला.