मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीम इंडियाचे स्पॉन्सर असलेल्या एडिडासने वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे एंथम लाँच केले असून ते क्रीडा प्रेमींमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. या एथंममध्ये खेळाडू नव्या जर्सीत दिसत आहेत. या जर्सीचा रंग ब्लू असला तरी यात काही बदल करण्यात आले आहे. या जर्सीच्या खांद्यावर अगोदर तीन पांढऱ्या पट्ट्या होत्या. आता या जागी तिरंगी पट्ट्या असणार आहे.
यावेळेसचे वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने जोरदार तयारी सुरु आहे. ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या सामन्याला सुरूवात होणार आहे.
विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यात हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.
या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघ आधीच पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन ठिकाणी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी खेळली जात आहे, ज्यामध्ये सहा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत. यातील दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत.
विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात
या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांसोबत राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लंड संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता.