इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मायक्रोस्पॅाटच्या क्लाऊड सेवांना शुक्रवारी अँटीव्हायरस क्राऊडस्ट्राइकच्या अपटेडमुळे अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जगभरातील एअरलाइन्स, टीव्ही टेलिकास्ट, बँकिगं आणि कॅार्पोरेट कंपन्याच्या कामाकाजावर परिणाम झला. तर अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या देशांमध्ये १ हजारांहून उड्डाणे रद्द करण्यात आली. तर ३ हजार विमाने उशिराने उडाली. भारतात इंडिगो, स्पाईसे जेट, आकासा एअर विस्तारा आणि एअर इंडिाय एक्सप्रेस या ५ एअरलाइन्सला फटका बसला.
जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचा सर्वर डाऊन झाला आहे. या सर्वरमध्ये बिघाड झालाय. त्याचा फटका सगळ्या जगाला बसला आहे. जगभरातील एअरपोर्ट्वर विमान सेवा ठप्प झाली आहे. अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला.