नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक सातपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या जागेवर चाळीस वर्षे जुन्या जिल्हा उद्योग केंद्राच्या इमारतीच्या व शिल्लक असलेल्या जागेवर उद्योग भवन २ उभारावे असा प्रस्ताव भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा प्रदेश प्रभारी भाजपा उद्योग आघाडी प्रदीप पेशकार यांनी २०१८ रोजी दिला होता.
पेशकार यांनी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई व उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे हे मागणी फेब्रुवारी २०१८ मध्येच केली होती . त्यानुसार प्रकल्प अहवाल व पाठपुरावा केला. तत्वतः मंजुरी २०१९ मध्ये मिळाली परंतु सरकार बदलामुळे व कोरोना मुळे मागील सरकारमध्ये काहीच न झाल्याने पुन्हा पाठपुरावा करावा लागला. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या पेशकार प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून आता या जागेवर सर्व सुविधायुक्त उद्योग भवन इमारत होते आहे.
या ठिकाणी विविध छोट्या उत्पादकांना डिस्प्ले करण्यासाठी मल्टीपर्पज हॉल असावा कॉन्फरन्स साठी सभागृह असावे व इतर शासकीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने प्रस्ताव दिला होता. नाशिकच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे काम यांच्या दूरदृष्टीने हेरले आणि पाठपुरावा करून ते पूर्ण केले याचे उद्योग जगतातून स्वागत होत आहे.