येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ (बॅच-१) संशोधन व विकास अंतर्गत येवला मतदारसंघातील ८ रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या ४१ किलोमीटरच्या आठ रस्त्यांसाठी ५३ कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील बाभूळगाव बु. ते भालेराव वस्ती या ४.०२० किलोमिटर रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी ५ कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच ममदापूर ते लांबेवस्ती रस्ता ४.८०० किमी रस्त्यासाठी ६ कोटी २० लाख ७९ हजार, नगरसूल ते खिर्डीसाठे ७.२०० किमी रस्त्यासाठी १० कोटी ३४ लाख ४३ हजार, राममा-०२ ते धामणगाव या ३.३९० किमी रस्त्यासाठी ४ कोटी ८७ लाख ७० हजार, राममा-०८ ते अनकुटे ते कुसूर रेल्वे स्टेशन या ५.२०० किमी रस्त्यासाठी ६ कोटी ७१ लाख ५५ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर रामा-०१ ते मानोरी बु. या ५.२४० किमी रस्त्यासाठी ६ कोटी ९७ लाख ६२ हजार,येवला ते बाभूळगाव.-भाटगाव-अंतरवेली-पिंपरी-साबरवाडी-खैरगवहाण-धनकवाडी- बाळापूर-विसापूर-नगरचौकी रोड ४.१०० किमी रस्त्यासाठी ४ कोटी ६४ लाख, तर निफाड तालुक्यातील खडक माळेगाव ते प्रजिमा-१७४-टाकळी विंचूर या ६.५७० किमी रस्त्यासाठी ७ कोटी ९४ लाख ८४ हजार रुपये निधीतून रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या दर्जोन्नती करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या पुढील दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी २ कोटी ५३ लाख ८५ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याने रस्त्यांचा दर्जा देखील टिकून राहून नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होऊन कामे पूर्ण करण्यात येणार आहे.