नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घराबाहेर जीन्यावर बसलेल्या मुलीची छेड काढत विनयभंग करणा-या ३२ वर्षीय तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू गांगुर्डे (रा.पंचवटी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडिता बुधवारी (दि.१७) रात्री जेवण आटोपून आपल्या घराबाहेरील जीन्यावर बसलेली असतांना ही घटना घडली.
रस्त्याने जाणा-या संशयिताने शिट्टी वाजून इकडे ये असे म्हणत मुलीचा विनयभंग केला. याबाबत मुलीने आपल्या कुटुंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक वर्षा पाटील करीत आहेत.