मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड रेल्वे स्थानकात नेहमी प्रमाणे सकाळी ११ वाजता येणा-या मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस आल्यानंतर औरंगाबाद कडे निघालेली असतांना दोन प्रवाशी महिला व त्यांचे चार वर्षाचे बाळ घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढत असतांना त्या दरवाज्यातून खाली पडल्या. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या दोघा लोहमार्ग पोलिसांनी दरवाजातून ट्रेन खाली जात असलेल्या महिला व बाळाला गाडी खाली जात असतांना त्यांना तेथून खेचून त्यांचा जीव वाचविला त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
त्यानंतर त्यांना दुस-या गाडीने पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्यात आले. रेल्वे स्थानकावर कर्त्यव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी दासरे व वाघ या दोघांनी तत्परता दाखवत त्यांचा जीव वाचविला.