नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- श्रीलंकेच्या दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यावेळी टी -२० व वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहे. भारतीय टी -२० संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली. तर वनडेसाठी रोहिमत शर्मा हाच कप्तान असणार आहे.
T20I संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (य़ष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी , अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
			








