नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे गटाला पहिल्यांदाच दिलासा दिला आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाचे सर्व निकाल ठाकरे यांच्या विरोधात होते. पण, पहिल्यांदा त्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे. या निकालात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यापुढे निधी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे.
लोकसभेत ही परवाणगी दिलेली नव्हती. पण, आता विधानसभेच्या निवडणूक अगोदर ही परवाणगी मिळाल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली आहे.
याअगोदर नुकतीच निवडणूक आयोगाने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालादेखील निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीदेखील निवडणूक आयोगात याबाबतची मागणी केली. त्यानंतर ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.