नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घराच्या नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देणे करीता ४ रुपयाच्या लाच प्रकरणात धुळे जिल्ह्यातील फागणे येथील ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील यांच्यासह शिपाई, रोजगार सेवक व सरपंचाचे पती लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सदर घराचे नमुना आठच्या उताऱ्यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करून तक्रारदार यांना त्यांच्या घराच्या नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देणे करीता तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली.
त्यानंतर तक्रार यांना सरपंचाचे पती व रोजगार सेवक यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी यांना 4,000 रुपये लाच देण्याकरीता प्रोत्साहन (अप प्रेरणा) दिले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी ४ हजार रुपये लाचेची मागणी करून शिपाई यांचे हस्ते स्वीकारली. त्यामुळे चारही व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष , 49 वर्ष, जिल्हा- धुळे
आलोसे –
1) भाऊसाहेब नामदेव पाटील, वय 47 वर्ष, ग्रामविकास अधिकारी, फागणे (वर्ग 3), रा. प्लॉट नंबर 16, नवनिधी, गोंदूर रोड, होम साई ट्रेनिंग सेंटरच्या मागे, संस्कृती कॉलनी, वलवाडी, देवपूर, धुळे.
2) नगराज हिलाल पाटील, वय 48 वर्ष, (खाजगी इसम सरपंच पती) रा. शनी मंदिर जवळ, फागणे, ता. जि. धुळे.
3) किरण शाम पाटील, वय 30 वर्ष, पद – शिपाई ग्रामपंचायत फागणे, (वर्ग4) रा. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या मागे, फागणे, ता. जि. धुळे.
4) पितांबर शिवराम पाटील, वय 43 वर्ष, पद – रोजगार सेवक ( वर्ग 4) ग्रामपंचायत फागणे, ता. जि. फागणे रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ, फागणे ता.जि. धुळे.
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- दि. 16.07.2024 व दि. 18.07.2024 रोजी 4,000/-रुपये .
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक- दि. 18.07.2024 रोजी 4,000/- रू
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांनी फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सदर घराचे नमुना आठ च्या उताऱ्यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करून तक्रारदार यांना त्यांच्या घराच्या नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देणे करीता तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली.
त्या अनुषंगाने दि. 16.7.2024 रोजी पंचां समक्ष पडताळणी केली असता, आलोसे क्र. 2 व 4 यांनी तक्रारदार यांना आलोसे क्र. 1 यांना 4,000 रुपये लाच देण्याकरीता प्रोत्साहन (अप प्रेरणा) दिली तसेच दिनांक 18.7. 2024 रोजी आलोसे क्र. 1 यांनी तक्रारदार यांचे कडे 4,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आलोसे क्र. 3 यांचे हस्ते स्वीकारल्याने आलोसे क्र. 1 ते 4 यांचे विरुद्ध म्हणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी– आलोसे क्र.1 मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे.
आलोसे क्र.3 व 4 ( सरपंच व कार्यकारी मंडळ, ग्रामपंचायत फागणे)
परिवेक्षण व तपासी अधिकारी-
श्री. सचिन साळुंखे
पोलीस उपअधिक्षक ला.प्र.विभाग, धुळे.
मो.न.9403747157, 9834202955*
सहायक सापळा अधिकारी-
पो.निरी.रूपाली खांडवी
ला.प्र. विभाग, धुळे
मो.नं. 8379961020.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम, पो.ना. संतोष पावरा, पो. कॉ. बारेला, पो. कॉ. प्रशांत बागुल सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे .