इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणाना बसणार आहे. तत्पूर्वी आज फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या दोघांत जवळपास तासभर चर्चा झाली.
राऊत हे बार्शीचे आमदार असून ते फडणवीस यांच्या निकटवर्तीय आमदारांपैकी एक समजले जातात. जरांगे यांचे मागील उपोषण सोडवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जरांगे यांच्या त्यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व आहे.या दोन्ही नेत्यांत काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण राऊत यांनी जरांगे यांना त्यांच्या प्रस्तावित उपोषणावर फेरविचार करण्याची विनंती केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
२० तारखेपासून उपोषण सुरू करील, तेव्हाच विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार पाडायचे, की उभे करायचे हे ठरवण्यात येईल, असे सांगून जरांगे म्हणाले, की माझ्यासाठी माझा समाज महत्त्वाचा आहे.