इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः छगन भुजबळांनी घेतलेल्या भेटीबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भेटीमागील कारण सांगितले. यावेळी ते म्हणाले की, बीड व बारामतीच्या सभेत त्यांनी माझे कौतुक केले, भुजबळ यांनी माझ्यावर प्रचंड आस्था दाखवली. ते अचानक माझ्या घरी आले. त्यांनी आरक्षणाबाबत चर्चा करून काही गोष्टी करण्याबाबत मी पुढाकार घ्यावा सांगितले. जरांगे यांची आणि सरकारी शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाल्यावर त्यांचे उपोषण सोडले गेले होते. सरकारमधील लोक मराठा नेते आणि ओबीसी नेते यांना एकाचवेळी भेटत असले,तरी त्यांच्याशी त्यांनी काय चर्चा केली हे सांगत नाहीत. त्यामुळे आम्ही सरकारने आयोजित केलेल्या आरक्षण बैठकीस गेलो नाही, असे पवार म्हणाले. विरोधकांना बाजूला ठेवून शांतता मार्गदर्शन करावे असे भुजबळ यांनी मला सांगितले. त्यावर जरांगे यांना सरकारने काय आश्वासने दिली ते सांगावे असे सांगितले आहे
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वार्तालाप घेण्यात आला. त्यावेळी ते बोलते होते. यावेळी ते म्हणाले की, सरकारमधील नेत्यांची वक्तव्ये राज्यातील समाजासमाजात तेढ निर्माण करणारी होती. राज्यात शांततेची गरज आहे, याबाबत शंका नाही. सरकारच्या वतीने आंदोलक मनोज जरांगे व प्रा. लक्ष्मण हाके यांना काय आश्वासने दिली, याची माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही,