नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडोंनी छत्तीसगड-गडचिरोली सीमेवर कांकेरजवळ जिल्ह्यात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सर्व १२ मृतदेह सापडले आहेत. स्वयंचलित मशीन गन आणि जड शस्त्रास्त्रे आणि नक्षलवाद्यांकडून दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. चकमकीत एक उपनिरीक्षक आणि दुसरा जवान जखमी झाला आहे, परंतु ते धोक्याबाहेर आहेत, ऑपरेशन अजूनही सुरू आहे पण पोलीसांची त्यावर करडी नजर आहेत.
पोलिसांच्या या कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५१ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या वतीने गडचिरोली पोलिसांना ही लाखोंची मदत मिळणार आहे.