नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रवी शंकर मार्ग भागातील कपड्यांचे गोडावून चोरट्यांनी फोडून सुमारे दोन लाखाचे कपडे लंपास केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंतनू रामचंद्र कुर्डूकर (रा.रवीशंकरजी मार्ग, विजय ममता मागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुर्डूकर कपड्याचे व्यापारी असून त्यांचे घर परिसरातील गोविंद कलम अपार्टमेंटमधील एका सदनिकेत गोडावून आहे. या गोडावूनच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ही चोरी केली.
गोडावून मध्ये शिरलेल्या चोरट्यांनी जॉनी नाईट कंपनीचे सुमारे ७०० शर्ट, ५० जीन्स, बनीयन व अंडरवेअर असा सुमारे दोन लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.