नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) देवळाली गावातील रोकडोबावाडी पुल परिसरात पाठलागानंतर परिचीताने मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयिताचा शोध घेत आहे.
धनंजय जयद्रथ काकडे (३२ रा. काकडेगल्ली रोकडोबावाडी, देवळालीगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार महिला रविवारी (दि.१४) दुपारी विहीतगावच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. महिलेचा पाठलाग करीत संशयिताने तिला रोकडोबावाडी पूल भागात गाठले.
या ठिकाणी पीडितेने त्याच्याशी बोलणे टाळले असता त्याने शिवीगाळ करीत तिला मारहाण केली. त्यानंतर विहीतगाव पर्यंत पाठलाग करून महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास पोलीस नाईक होलगीर करीत आहेत.