मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले. अकोला पश्चिम मतदार संघातून सातत्याने निवडून येणारे गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये रमणारे, जनमाणसांशी नाळ जुळलेले नेते होते.
राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असं त्यांचं नेतृत्व होतं. त्यांच्या निधनाने जुन्या आणि नव्या पिढीशी उत्तम संपर्क, समन्वय असलेला लोकप्रतिनिधी हरपला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी दिवंगत गोवर्धन शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात गोवर्धन शर्मा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.