इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.शरद पवारांच्या उपस्थितीत मोदीबाग येथे भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अन्य १८ पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला.
अजित गव्हाणे, राहुल जाधव, हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, पंकज भालेकर, समीर वाबळे, गीता मंचरकर, वैशाली उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, रवींद्र सोनवणे, यश साने, वसंत बोऱ्हाटे, संजय नेवाळे, प्रवीण भालेकर, निवृत्ती शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली आहे.
पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. पण, या बालेकिल्ल्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर अजितदादांना मोठा धक्का बसला आहे.