नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही सर्वपक्षीय बैठक, २१ जुलै, २०२४ रोजी नवी दिल्ली येथील संसद भवन ऍनेक्स मध्ये मुख्य समिती कक्षात सकाळी ११ वाजता होणार आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै, २०२४ रोजी सुरू होणार असून सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यकतेनुसार, हे अधिवेशन १२ ऑगस्ट, २०२४ पर्यंत चालेल.