मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री उर्फी जावेदवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तीने भारतातून काढता पाय घेत दुबई गाठल्याची चर्चा आहे. उर्फीने मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा एक व्हिडिओ समोर व्हायरल केला होता. पण, हा व्हिडिओ खरा नसल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फीसह इतर पाच ते सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर उर्फीने भारतातून काढता पाय घेतला.
उर्फी तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या नवीन ड्रेसमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फोटोग्राफर्सना पोज देते, ज्यासाठी तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलला सामोरे जावे लागते. पण, आता तीचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उर्फीला रेस्टॅारंटबाहेरून दोन महिला पोलिस घेऊन जातांना दिसत आहे. अगोदर या पोलिसांशी वाद झाल्यानंतर ती या महिला पोलिसांबरोबर पोलिस व्हॅनमध्ये बसते. असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई करतांना पोलिसांनी म्हटले आहे की, स्वस्त प्रसिद्धीसाठी, कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही! मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा एक व्हायरल व्हिडिओ खरा नाही-सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे.
तथापि, दिशाभूल करणार्या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरूद्ध, ओशिवरा पोलिस ठाणे येथे कलम १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असताना, तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि वाहनही जप्त करण्यात आले आहे.
याअगोदरही उर्फी चर्चेत
याअगोदर मॉडेल उर्फी जावेद ही सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. त्यानंतर मुंबई पोलिसांकडे अभिनेत्रीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर उर्फी जावेद हिने महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. तिथे तिनी रुपाली चाकणकर यांच्याशी या विषयावर चर्चा केल्याची चर्चा झाली होती.
आता पुन्हा उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता दाखवल्याचा आरोप करत पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ चर्चेत आला. पण, तो उर्फीच्या अंगलट आला…
Model Urfi Javed Mumbai Police Enquiry video