येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहर व तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. येवला शहरातील अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले तर रस्त्यावरील पाणी हुडको कॉलनी भागात असलेल्या किशोर सोनवणे यांचे रेशनच्या दुकानात गेल्याने दुकानात पाणीच पाणी झाले. त्यामुळे रेशनचे धान्य ओले झाल्याने आता ग्राहकांना धान्य कसे द्यायचे हा मोठा प्रश्न आता त्यांच्या पुढे उभा राहिला आहे. तर शहरातील सकल भागात पाणी तुंबणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.