इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंतरराज्यीय नोकरीच्या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत, मुंबई गुन्हे शाखेने तरुणांना आंतरराष्ट्रीय नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली. भिवंडी, मुंबई, दिल्ली, लखनौ आणि बिहार येथून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या टोळीतील सदस्यांनी प्लेसमेंट एजन्सीच्या नावावर पीडितांकडून ४०, ५० हजार रुपये गोळा करून त्यांचे पासपोर्ट काढले आणि त्यांना बनावट ऑफर लेटर आणि व्हिसा उपलब्ध करून दिला.
मुंबई येथे वेगवेगळ्या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरुणांना परदेशात नामांकीत कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे आमिष देऊन तरुणांकडून त्यांचे पासपोर्ट जमा करून बनावट ऑफर लेटर व व्हिजाद्वारे प्रत्येकी ४० ते ५० हजार रूपयाची अशी फसवणूक ही टोळी करत होती.