नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात एका कांदा उत्पादक शेतक-यांला एकाच कांद्याचे दोन बाजर समितीत वेगवेगळे भाव मिळाले. देवळा येथे हा कांदा २ हजार रुपये क्विटंलने तर उमराणे येथे हाच कांदा २५११ रुपये क्विटंलने विकला गेल्याचे देवळा तालुक्यातील खामखेडा येथील योगेश शिरोरे यांनी सांगितले. त्याच्या पावत्याही त्यांनी दिल्या आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आज मी देवळा मार्केटला कांदा विक्रीसाठी पाठवला होता तिथे सकाळ सत्रात माझा कांदा २००० रुपये क्विंटल गेला तोच कांदा मी सकाळच्या सत्रात तातडीने उमराणा मार्केटला नेला. तिथे तोच कांदा २५११ रुपये क्विंटल या दराने गेला. दोन मार्केटच्या भावातील एवढी तफावत दिसून आली. देवळा मार्केट शेतकऱ्यांसाठी लाभदायक नाही हे यावरून दिसून येते व्यापारी रिंग पद्धतीने माल घेतात असे लक्षात येते .मार्केट कमिटी फक्त नावाला शिल्लक आहे. असे वाटते मार्केट कमिटीतील पदाधिकारी व व्यापारी यांचे मजबूत लागेबांधे आहेत. येथील मार्केटला माणसं पाहून माल विकला जातो ,मालाचे मोल होत नाही असे दिसते.
या अशा शेतकऱ्यांच्या व्यथांची तक्रारही कुठे करता येत नाही तक्रार केली तरी कोणी दखलही घेणार नाही .कारण शेतकरी फक्त निवडणुकीपुरता असतो. ज्या व्यापाऱ्याने दोन हजार रुपये घेतला त्याची चूक नाही त्याला सर्व मिळून बक्षीसी दिली हा त्याचा योग. शेतकऱ्यांच्या अशा अनेक व्यथा आहेत त्यातलीच ही एक
योगेश शिरोरे,
(खामखेडा, ता. देवळा, जि नाशिक)