इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे चौकशी समितीने म्हटले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार या प्रकरणात कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. राज्यात मोहीम यशस्वी झाल्याचेही समितीने म्हटल्याने मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवडीची घोषणा केली होती. कालांतराने यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीसाठी समितीची घोषणा विधानसभेत केली होती. या समितीने केलेया सखोल चौकशीत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे निष्कर्ष काढले आहेत.