नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील क्ष किरण तज्ञ डॉ. मंगेश थेटे यांची आयएमए महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नाशिकला निवडणुकीद्वारे प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.
डॉ. मंगेश थेटे हे २०१७ मध्ये नाशिक आयएमएचे अध्यक्ष व २०१४ मध्ये नाशिक आयएमएचे सचिव म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी आयएमए सदस्यांसाठी भरीव कामगिरी केली. नाशिक परिसरातील रुग्णांसाठी त्यांचे आशा सोनोग्राफी क्लिनिक एक उत्कृष्ट निदान व सेवा क्लिनिक म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच ते जिल्हा रुग्णालय नाशिक व संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथे क्ष किरण तज्ञ व विभाग प्रमुख रेडीओलॉजी म्हणून गेली वीस वर्ष रुग्णाभिमुख सेवा देत आहे. शासकीय सेवेत देखील त्यांनी सिटीस्कॅन व सोनोग्राफीचे सोनोग्राफीची विक्रमी कामगिरी केल्याने शासन स्तरावर त्यांची उपसंचालक पदासाठी व आनंदीबाई जोशी पुरस्कारासाठी शिफारस झाली होती.
त्यांच्या या निवडीबद्दल आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेच्या व सचिव डॉ. रविराज खैरनार माजी अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. आवेश पलोड, डॉ. विशाल पवार आणि डॉ. हेमंत सोननिस नियोजित अध्यक्ष डॉ. निलेश निकम व आयएमए कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.
डॉक्टरांवरील हल्ले, रुग्णालय नोंदणीकरण, प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या जाचक अटी, तसेच रुग्णालय नोंदणीकरण एक खिडकी योजना, पीसीपीएनडीटी ऑनलाईन नोंदणी करण इत्यादी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर राज्यस्तरावर आवाज उठवण्याचा मानस डॉ. मंगेश थेटे यांनी या निवडीनंतर व्यक्त केला आहे.