ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात पोषण धान्य वाटप करतेवेळी त्यात अळ्या व किडे आढळून आले होते. संबंधित पालकांनी यावर आवाज नोंदवण्याची धमकी देत सज्जड दम भरला होता. त्यास पालकांनी ठोकरून लावल्याने सोपान वाटपाडे यांनी नमती भूमिका घेतली. परंतु तातडीने शासनाने या गंभीर घटनेची दखल घेत पोषण अधीक्षक यांना पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यांनी सोमवारी पाहणी करत दोन दिवसात अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
सोमवारी पाहणी करून गेलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना सदर शाळेच्या देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याने कागदपत्रे सादर केली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी बचत गट बाबत करारनामा आणि काही कागदपत्रे उपलब्ध झाली नाही. याबाबत मुख्याध्यापक वाटपडे हे स्वतः निफाड कार्यालयात ते सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. स्वतः अधिकारी जागेवर आले असता शासनाच्या नियमाला धरून गावातीलच बचतगटाला देणे क्रमप्राप्त असताना तोच गट बाहेरचा असल्याने वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुळात शासन आणि गावातील शाळा यांचा थेट संबंध असताना त्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना का घेतले जाते हाच मुद्दा संशयास्पद ठरला आहे. येणाऱ्या दोन दिवसात पोषण अधीक्षक प्रशांत गायकवाड हे गट विकास अधिकारी यांना अहवाल सादर करणार आहे.
दोन दिवसात अहवाल
मी सोमवारी सर्वच पाहणी केली.बचत गट संबंधी व इतरही काही कागदपत्रांची मागणी केली परंतु तेव्हा उपलब्ध नसल्याने दिली गेली नाही. ती महत्वाची कागदपत्रे संबंधित शाखा आणून देणार आहे. येत्या दोन दिवसात अहवाल बनवून गटविकास अधिकारी यांना सादर करेल.पुढील निर्णय वरिष्ठ घेतील.
प्रशांत गायकवाड
पोषण अधीक्षक, निफाड.