मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जातात. माहे जून-२०२४ मध्ये दि. ०८/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, दि. १४/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष, दि. १९/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २१/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, व दि. २६/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा),महाराष्ट्र राज्य लॉटरी,वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2406-A/15221 या श्री.महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाली आहेत. या सोडतीच्या एकूण २६९७ तिकिटांना एकूण रु.१७,७६,७५०/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष तिकीट क्रमांक GS-04/6625 या जलाराम लॉटरी, अकोला यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. २२ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण १४०५ तिकिटांना एकूण रू.२९,०३,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ६१८५ तिकिटांना एकूण रु.८,०८,५००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ८६८ तिकिटांना एकूण रु.५,६३,२००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गजराज मालिका तिकीट क्रमांक GJ-01/0959 या श्री. गणेश एंटरप्रायजेस, दादर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. १४ लाखांचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहेत. या सोडतीच्या एकूण २००५ तिकिटांना एकूण रू.१६,३०,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
याशिवाय जून- २०२४ मध्ये साप्ताहिक सोडतीतून ३६७१८ जणांना रू. १,३२,८८,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्याकडून कळविण्यात आले आहे.