इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. या यात्रेला २५ जुलैला दादर चैत्यभूमी येथून सुरुवात होणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. यानंतर ७ किंवा ८ ऑगस्टला तारखेला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर येथे सांगता होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
२५ तारखेला दादर चैत्यभूमी येथून सुरुवात करायची. त्याच दिवशी पुणे येथे फुलेवाड्यात २६ जुलै ही महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्यामुळे शाहू महाराजांसमोर नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जन यात्रा काढणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. ७ किंवा ८ ऑगस्टला तारखेला औरंगाबादमध्ये सांगता होईल अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.