गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीचे सत्र सुरूच…शहरातील वेगवेगळया भागातून पाच दुचाकी चोरीला

by India Darpan
जुलै 16, 2024 | 3:30 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- .शहरातील वेगवेगळया भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी आडगाव,गंगापूर,अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना सिडकोतील मोरवाडी येथे घडली. दीपक रामचंद्र जाधव (रा.राहूलजी शाळेजवळ मोरवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव यांची स्प्लेंडर एमएच ४१ ई ७६९७ गेल्या शनिवारी (दि.१३) रात्री त्यांच्या घर परिसरात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत. तर दुस-या घटनेत सातपूर एमआयडीसीतून दोन मोटारसायकली चोरीस गेल्या. राजेश विलास चारोस्कर (रा.रेणूका किराणा जवळ,गणेश चौक कामगारनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ एचव्ही ७५९५ गेल्या गुरूवारी (दि.११) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. तर प्रकाश अमृता डहाळे (रा.गणेशगाव ता.जि.नाशिक) यांची एमएच १५ जीई ४२२९ मोटारसायकल गेल्या शुक्रवारी (दि.१२) औद्योगीक वसाहतीतील महिंद्रा मेटल या कारखान्याच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. अधिक तपास हवालदार बेंडकुळे व मुसळे करीत आहेत.

चौथ्या घटनेत आडगाव येथील प्रकाश उत्तम माळोदे (रा.मते गल्ली संभाजी चौक) हे रविवारी (दि.१४) नांदूनाका भागात गेले होते. जत्रा नांदूर लिंकरोडवरील शेवंता लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ सीवाय ०९४५ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत. पाचवी घटना कॉलेजरोड भागात घडली. इम्रान रफिक शेख (रा.हिरवेनगर,द्वारका ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांची मुलगी सारा शेख ही गेल्या शुक्रवारी (दि.१२) कॉलेजरोड भागात गेली होती. येवलेकर मळा भागातील शिनार संकुल मध्ये लावलेली तिची एमएच १५ जेएल ६७८० मोपेड दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संगीतकार संजय गीते यांच्या विठ्ठल भजनाचे प्रकाशन….

Next Post

या ठिकाणी राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक व यात्री निवास…११ हेक्टरवर ३४ फलाट

India Darpan

Next Post
IMG 20240716 WA0201 e1721126343509

या ठिकाणी राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक व यात्री निवास…११ हेक्टरवर ३४ फलाट

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011