रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक……मालेगावच्या या कर सल्लागाराला ८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी अटक….१७ वेगवेगळ्या संस्थांवर छापे

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 3, 2023 | 9:36 pm
in मुख्य बातमी
0
gst

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

मालेगाव हे महाराष्ट्रातील प्रमुख टेक्सटाईल हब आणि एमएसएमई उद्योगाचे केंद्र आहे. सौरभ वर्धमान बुरड (जैन) हे नोंदणीकृत (जीएसटी) कर सल्लागार आणि (जीडीसीए) आहेत जे विविध व्यावसायिकांना नवीन (जीएसटी) नोंदणी आणि नियतकालिक (जीएसटी) रिटर्न भरण्यास मदत करतात.

उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा मासिक डेटा सौरभ वर्धमान बुरड (जैन) यांच्याकडे सहज उपलब्ध होता आणि या डेटाच्या मदतीने केवळ बुरड या व्यावसायिकांचे मासिक विवरणपत्र भरत होते. या प्रक्रियेदरम्यान बुरड या करदात्यांच्या नियमित उलाढालीमध्ये इतर बोगस उलाढाल जोडत होते आणि काही व्यावसायिकांच्या माहिती शिवायही बनावट पावत्या आणि त्यांच्या नोंदी जीएसटी आर (1) मध्ये जारी करत होते. या बनावट इनव्हॉइसचा वापर इतर करदात्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे वास्तविक कर दायित्व कमी करण्यासाठी किंवा काही प्रकरणांमध्ये ‘इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर’मध्ये काल्पनिक आणि बोगस परताव्याचा दावा करण्यासाठी केला गेला.

बोगस सूत व्यापाराशी संबंधित कापड व्यापारी आणि उत्पादकांच्या या संपूर्ण क्लस्टरची चौकशी राज्यकर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार (IAS) यांच्या नेतृत्वाखाली मुंबई वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण-अ शाखेने सुरू केली होती. राज्यकर उपायुक्त सुनील एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक राज्यकर आयुक्त संतोषकुमार पी. राजपूत यांच्या देखरेखीखाली मुंबई कार्यालयातील २० हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन दिवसांच्या कालावधीत मालेगावातील १७ वेगवेगळ्या संस्थांवर छापे टाकले. सहायक राज्यकर आयुक्त अमोल के. सूर्यवंशी आणि सहायक राज्यकर आयुक्त जितेंद्र बी. सोनवणे यांनी शहरातील कर व्यावसायिकांचा अंतिम सहभाग सिद्ध करून हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळवले. या बनावट पावत्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात बोगस परतावा मिळविला जात असल्याचा संशय आहे.

विभागाकडून नोंदणीकृत वस्तू व सेवाकर कर सल्लागाराची ही पहिली अटक असेल जिथे व्यावसायिक सल्लागाराचा फसव्या व्यवहारांशी थेट संबंध उघडकीस आला. प्राथमिक तपासात स्वतः सौरभ बुरड (GSTP) यांनी ९ वेगवेगळ्या संस्थांचा वापर करून ८६.६० कोटी पेक्षा जास्त किमतीच्या बोगस पावत्या जारी केल्या आहेत आणि त्याद्वारे एकूण १०.३९ कोटी रुपयांच्या बनावट (ITC) इनपुट टॅक्स क्रेडिट पास केल्या आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी सौरभ बुरड (जैन) यांना १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आर्थिक वर्षातील या २१ व्या अटकेने राज्य वस्तू व सेवाकर विभागाने बोगस रॅकेट व्यवस्थापक करचोरी करणाऱ्यांविरोधात प्रभावीपणे कारवाई केली असल्याचे प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिटीलिंक बसने रोज प्रवास करत असाल तर ही सुचना बघा….

Next Post

या व्यक्तींनी नवीन काम व प्रवास टाळावे, जाणून घ्या शनिवार, ४ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी नवीन काम व प्रवास टाळावे, जाणून घ्या शनिवार, ४ नोव्हेंबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011