इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूरः पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी तुलना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. वस्त्रोद्योगनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची थेट पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आजूबाजूला सर्व अदृश्य शक्तींनी धैर्यशील मानेंना घेरले असताना त्यांनी दिवा लावला, असे पाटील म्हणाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अज्ञात शक्तीने घेरले होते, तरीदेखील या वादळात त्यांनी दिवा लावून विजय मिळवला, असे वक्तव्य त्यांनी वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते. काही अज्ञात शक्तीदेखील माझ्यासोबत होत्या. होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हणत माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले; परंतु हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने वाद सुरू झाला आहे.