इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने दोन आठवड्यात अजित पवार गटाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची सुनावणी आता ६ ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालात शरद पवार गटाकडूंन सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर ही सुनावणी झाली.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ४३ आमदार अजित पवार गटाकडे गेले तर शरद पवारांकडे १२ आमदार आहेत. त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय़ देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केले. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणीची झाली. त्यात न्यायालयाने दोन आठवड्यात अजित पवार गटाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची सुनावणी आता ६ ऑगस्टला होणार आहे.