अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तहसिल कार्यालय, अहमदनगर यांच्या अधिनस्त असलेल्या जप्त मुद्देमाल गव्हाचा शासकीय अन्नधान्य गोदाम ( पाच गोडावुन) ता. अहमदनगर येथे २४ जुलै, रोजी दुपारी ३ वाजता लिलाव करण्यात येणार असुन इच्छुक भुसार माल खरेदी-विक्री वैध परवानाधारकांनी लिलावात अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तहसिलदार संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक राहणार आहे. लिलावाबाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पहावयास उपलब्ध राहतील. तसेच लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार तहसिल कार्यालयाने राखुन ठेवला असल्याचेही कळविण्यात आले आहे.