नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या ८ दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. परिणामी शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्ट्या लागल्या आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने सध्यस्थितीत पास काढणार्या प्रवाश्यांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे सण-उत्सव कालावधीकरिता पास केंद्राच्या वेळेत अंशतः बदल करण्यात येत आहेत.
त्यानुसार सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेतच पास केंद्र सुरू राहतील मुख्य म्हणजे हा वेळेतील बदल केवळ ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीकरीताच करण्यात आला आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ज्या प्रवाशांना पास काढावयाचा असेल अशा प्रवाशांनी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेतच काढून घ्यावा.
सद्यस्थितीत सिटीलिंक मुख्यालय, निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक या तीन ठिकाणी पास केंद्र सुरू असून या सर्व ठिकाणी हा निर्णय लागू असेल. तसेच दिनांक १९ नोव्हेंबर पासून पास केंद्र पूर्ववत सुरू राहातील याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी.