इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतातील ज्या क्रिकेट स्टेडियममध्ये आयसीसी विश्वचषक 2023 होणार आहे, तिथे रिलायन्स जिओचा डाउनलोड स्पीड एअरटेलच्या दुप्पट आणि होडाफोन आयडिया पेक्षा 3.5 पट जास्त आहे. ओपन सिग्नलच्या अहवालानुसार, जिओने भारतीय क्रिकेट स्टेडियमच्या आत आणि बाहेर मोजली जाणारी डाउनलोड गती मध्ये बाजी मारली. रिलायन्स जिओची सरासरी डाउनलोड गती 61.7 एमबीपीएस इतकी मोजली गेली. एअरटेल 30.5 Mbps सह दुसऱ्या स्थानावर, तर व्होडा आयडिया 17.7 Mbps सह तिसऱ्या स्थानावर मागे असल्याचे दिसून आले.
ओपन सिग्नल रिपोर्टमध्ये, रिलायन्स जिओ देखील 5G डाउनलोड गतीच्या बाबतीत प्रथम स्थानावर आहे. जिओ चा 5G डाउनलोड स्पीड एअरटेल पेक्षा 25.5 टक्के जास्त होता. जिओ चा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 344.5 Mbps नोंदवला गेला, तर एअरटेल 274.5 Mbps सह दुसऱ्या क्रमांकावर आला. आम्ही तुम्हाला सांगतो की व्होडा आयडीया सध्या 5G सेवा देत नाही. आयसीसी विश्वचषक 2023 चे सामने देशातील 10 स्टेडियममध्ये होणार आहेत. यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम ते कोलकाता येथील ईडन गार्डनसारख्या ऐतिहासिक स्टेडियमचा समावेश आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ आणि धर्मशाला या क्रिकेट स्टेडियममध्येही सामने होणार आहेत.
क्रिकेट स्टेडियम्समध्ये एकूण अपलोड गतीच्या बाबतीत निकराची स्पर्धा होती. एअरटेल चा सरासरी अपलोड स्पीड 6.6 Mbps तर जिओ चा 6.3 Mbps मोजला गेला. व्होडा आयडिया 5.8 Mbps सह तिसर्या क्रमांकावर आहे. सरासरी 5G अपलोडच्या बाबतीत एअरटेल अव्वल आहे, एअरटेलचा वेग 26.3 Mbps होता तर रिलायन्स जिओ चा 21.6 Mbps होता.
ओपन सिग्नलने आयसीसी विश्वचषक स्टेडियमच्या आत आणि बाहेर 5G कनेक्टिव्हिटीच्या उपलब्धतेचे परीक्षण केले. नेटवर्कची उपलब्धता ग्राहक 5G नेटवर्कवर घालवलेल्या वेळेनुसार मोजली जाते. अहवालानुसार, वर्ल्ड कप स्टेडियममध्ये 5G उपलब्धतेच्या बाबतीत जिओ अव्वल स्थानावर आहे. जिओचे ग्राहक 53 % पेक्षा जास्त वेळा 5G नेटवर्कशी जोडलेले राहिले तर एअरटेलचे ग्राहक 5G नेटवर्कशी फक्त 20.7% वेळा कनेक्ट होऊ शकतात. त्यानुसार, जिओ च्या 5G नेटवर्कची उपलब्धता एअरटेलच्या तुलनेत 2.6 पट जास्त असल्याचे नोंदवले गेले.
जिओ एकूण डाउनलोड गतीमध्ये एअरटेल पेक्षा दुप्पट आणि व्होडा आयडिया पेक्षा 3.5 पट वेगवान आहे.
• क्रिकेट स्टेडियममध्ये जिओ चा 5G डाउनलोड स्पीड एअरटेल पेक्षा 25.5 टक्के जास्त आहे.
• जिओ 5G नेटवर्क उपलब्धतेमध्ये प्रतिस्पर्धी एअरटेलपेक्षा 2.6 पट पुढे आहे.