नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भुसावळ विभागातील निफाड स्टेशन येथे डाऊन लूप लाईन ,अप लूप लाईन आणि अप गुड्स शेड लाईन चा लांबीचा विस्तार करण्यात येत असून या कार्याकरिता नॉन इंटरलॉकिंग कार्य घेण्यात येत आहे. नॉन इंटरलॉकिंग कार्य दिनांक १६.०७.२०२४ रोजी करण्यात येत आहे. त्याकरिता पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक परिचलीत करण्यात येईल. नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाड्याचे रद्दीकरण –
१) गाडी क्रमांक ११११९ इगतपुरी -भुसावळ मेमू दिनांक १६.०७.२०२४ रोजी रद्द.
२) गाडी क्रमांक १११२० भुसावळ -इगतपुरी मेमू दिनांक १६.०७.२०२४ रोजी रद्द.
३) गाडी क्रमांक ११११३ देवळाली -भुसावळ एक्सप्रेस दिनांक १६.०७.२०२४ रोजी रद्द.
४) गाडी क्रमांक ११११४ भुसावळ- देवळाली एक्सप्रेस दिनांक १६.०७.२०२४ रोजी रद्द
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.