मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज मातोश्रीवर भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पाद्यपूजन केले. यावेळी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की उध्दव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दु:ख जाणार नाही. कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल, पण, जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोदी माझ्यासमोर आले त्यांनी प्रणाम केला आणि आमचा नियम आहे जो कोणी प्रणाम करायला येतो. त्याला आम्ही आशीर्वाद देतो. नरेंद्र मोदी माझे दुश्मन थोडी आहेत. त्यांच्या हिताबद्दल मी बोलत असतो. त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो. चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो.