शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले हे निर्देश

जुलै 15, 2024 | 4:26 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240715 WA0260

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशन मोडवर काम करावे. एकही पात्र माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

राज्य शासनामार्फत घोषित ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’योजनेच्या अंमलबजावणी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, , अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आदित्य मिरखेलकर , निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आदि उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवून ३१ ऑगस्ट केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील योजनेशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी नोंदणी प्रक्रियेला गती देऊन, विशेष मोहिमेद्वारे ही योजना मिशन मोडवर राबवावी व मुदतीपूर्वीच जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांची नोंदणी पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्देशाप्रमाणे तालुका, विधानसभा क्षेत्र पातळीवर समिती गठण करावी. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे, ही योजना राबविताना कोणाचीही अडवणूक करू नये. सजग राहून चुकीचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतच्या जिल्ह्यातील कार्यवाहीचा आढावा सादर केला. तसेच, सुनील दुसाणे यांनी या योजनेची माहिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर प्रत्यक्षात झालेली नोंदणी यांची माहिती सादर केली.

जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात ऑफलाईन पद्धतीने 10 हजार 660, ऑनलाईन पद्धतीने एक हजार 36 असे एकूण 11 हजार 696 अर्ज प्राप्त झाले आहेत. नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात ऑफलाईन पद्धतीने सहा हजार 762, ऑनलाईन पद्धतीने एक हजार 123 असे एकूण 7 हजार 885 अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा परिषद स्तरावर ऑफलाईन पद्धतीने 82 हजार 919, ऑनलाईन पद्धतीने 41 हजार 644 असे एकूण एक लाख 24 हजार 563 अर्ज प्राप्त झाले आहेत. अशा रीतीने वैयक्तिक व शासकीय यंत्रणा बाहेरील व्यक्ती व्यतिरिक्त जिल्ह्यात एकूण ऑफलाईन पद्धतीने एक लाख 341, ऑनलाईन पद्धतीने 43 हजार 803 असे एकूण एक लाख 44 हजार 144 अर्ज प्राप्त झाले आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचाही घेतला आढावा
ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी व त्यांना मोकळेपणाने जगता यावे, यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांचे कौटुंबिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित राहील. शासकीय यंत्रणांनी टीम वर्कद्वारे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादिद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत एकवेळी एकरकमी रक्कम रूपये तीन हजारांची आर्थिक मदत करण्यात येते. याचाही आढावा यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्महत्येचे सत्र सुरूच… वेगवेगळया भागात राहणा-या तिघांची आत्महत्या

Next Post

शरद पवार – छगन भुजबळ भेटीवर मनोज जरांगे पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
manoj jarange

शरद पवार - छगन भुजबळ भेटीवर मनोज जरांगे पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011