गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओझरला या शाळेतून अळ्या किडेयुक्त पोषण धान्य विद्यार्थांना वाटप…जाब विचारल्यानंतर मुख्याध्यापकांची अरेरावी ( बघा व्हिडिओ)

by India Darpan
जुलै 15, 2024 | 3:14 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240715 WA0212 e1721036459245

ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात शालेय पोषण आहार देते वेळी वाटप केलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणावर किडे आणि अळ्या निघाल्याने खळबळ उडाली असून याबाबत संबंधित पालकांनी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांना जाब विचारला असता त्यांनी अर्वाच्च शब्द वापरत पालकांनाच दम भरल्याचा प्रकार ओझर येथे घडला.

राज्य शासनाच्या वतीने अनुदानित शाळांना पोषण आहार व तांदूळ देण्यात येतो. गेल्या शुक्रवारी विद्यार्थांना वाटप केलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणत अळ्या आणि किडे आढळून आले.त्यातील एक पालक संजय पाटील यांनी सदर बाब सोशल मीडियावर व्हायरल केली असता त्यांना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी तुमच्या मुलीचे भवितव्य आमच्या हातात आहे असा थेट दम दिल्याने शाळेत मोठा कल्लोळ झाला. यावेळी स्थानिक बातमीदार यांनी परिस्थिती पाहिली असता त्यांनी पोलिसांची धमकी देत हा गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याबाबत स्थानिक व्यवस्थापन समिती अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.पालकांनी मात्र या वितरण प्रणालीच्या चौकशीची मागणी पालकांनी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी महेश पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी तातडीने दखल घेत पोषण अधीक्षक प्रशांत गायकवाड यांना पाहणी करण्याचे आदेश दिले.

धान्यगृहाची पाहणी केल्याने मुख्याध्यापक संतापले.
या घडलेल्या प्रकाराबद्दल पालक संजय पाटील यांनी स्थानिकांना घेत पाहणी केली.त्यांच्यासमवेत काही वार्ताहर देखील होते.सदर बाब समोर दिसल्याने वाटपाडे यांनी पोलिसांची धमकी देत त्या पालकाला दम दिला.परंतु पालक देखील आक्रमक झाल्याचे पाहून वाटपाडे यांनी विषयांतर करत इतर शिक्षकांना एकत्र करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

पाल्या समोर दम भरला
माझी मुलगी याच विद्यालयात इयत्ता आठवीत शिकते.शुक्रवारी सायंकाळी त्यांना तांदूळ दिले गेले. घरी आल्यावर त्यात कीड आणि अळ्या मोठ्या प्रमाणत दिसल्या.तातडीने मी जाब विचारल्यावर त्यांनी अर्वाच्चपणे बोलून विषय संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी सोशल मीडियावर हा प्रकार टाकल्यावर मला शाळेत बोलवत पाल्या समोर दम भरला. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात नको जायला म्हणुन या पोषण आहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
संजय पाटील, पालक.

मी जास्त बोलू इच्छित नाही
जे धान्य वितरीत केले गेले ते एप्रिल मध्ये मिळाले होते. त्यानंतर शाळेला सुट्ट्या लागल्या. नंतर ते वितरीत केले गेले. पोषण आहार वेळी धान्य निवडले जाते पण वाटप करताना ते सरसकट केले जात असल्याने याबाबत मी जास्त बोलू इच्छित नाही.
सोपान वाटपाडे, मुख्याध्यापक
माधवराव बोरस्ते विद्यालय.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फुकट दारू न दिल्याने एकाने दुकान पेटवून दिले….सिन्नर फाटा भागातील घटना

Next Post

नाशिकमध्ये पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ७०० शिकाऊ उमेदवार, अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र

India Darpan

Next Post
IMG 20240715 WA0233

नाशिकमध्ये पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ७०० शिकाऊ उमेदवार, अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011