मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फुकट दारू न दिल्याने एकाने दुकान पेटवून दिले….सिन्नर फाटा भागातील घटना

by Gautam Sancheti
जुलै 15, 2024 | 2:27 pm
in क्राईम डायरी
0
fire11 e1705415050443


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर फाटा भागात फुकट दारू न दिल्याने एकाने दुकान पेटविल्याची घटना घडली. दारूच्या दुकानातील काऊंटर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने मोठे नुकसान झाले असून अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलीसांनी पसार झालेल्या संशयितास बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव उर्फ सोनू सुभाष भागवत (३२ रा.नाशिक पुणा रोड सिन्नरफाटा,ना.रोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याबाबत सचिन रमेश वाघ (रा. निमाणी राजवाडा,पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स या दारू दुकानावर व्यवस्थापक पदावर कार्यरत असून रविवारी (दि.१४) ते दारू विक्रीचा व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास आलेल्या परिचीत संशयिताने वाईन्स शॉपमधील कामगार विजय सोनकांबळे याच्याकडे तुमचे दुकान जर चालू ठेवायचे असेल तर मला रेड लेबलचा खंबा दे, मला जर खंबा दिला नाही तर मी तुमचे दुकान चालू देणार नाही अशी धमकी दिली होती.

यानंतर सव्वा चार वाजेच्या सुमारास येऊन संशयिताने खंबा न दिल्याचे सल मनात धरून बाटलीत भरूण आणलेले पेट्रोल काऊंटरवर टाकून ते पेटवून दिले. अचानक घडलेल्या या घटनेने दारू दुकानातील कर्मचा-यांसह ग्राहकांची पळपळ झाली. यावेळी संशयिताने तेथून पळ काढत धूम ठोकली. दुकानात मोठ्या संख्येने दारू साठा असल्याने कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखत पाण्याचा मारा केला. काऊंटर अचानक आगीचा भडका उडाल्याने काऊंटरसह छतालाही आगीने लक्ष केले. संपुर्ण दुकानात प्लाऊडचा वापर करण्यात आल्याने तसेच दारूही ज्वलनशिल पदार्थ असल्याने परिसरातील नागरीकांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

या घटनेची माहिती पोलीसांसह अग्निशमन दलास कळविण्यात आल्याने अग्निशमन दलाच्या बंबसह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच दुकानातील कामगारांसह स्थानिकांनी मदत कार्य हाती घेत पाण्याचा मारा केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक अजित शिंदे करीत आहेत.
……….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची या कारणासाठी घेतली भेट….

Next Post

ओझरला या शाळेतून अळ्या किडेयुक्त पोषण धान्य विद्यार्थांना वाटप…जाब विचारल्यानंतर मुख्याध्यापकांची अरेरावी ( बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Untitled 22
संमिश्र वार्ता

नाशिकहून एअरलिफ्ट करण्यासाठी हॅलिकॉप्टर…बीडमध्ये बचाव कार्याला गती

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक…बघा, शासनाचा निर्णय

सप्टेंबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या,मंगळवार, १६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Next Post
IMG 20240715 WA0212 e1721036459245

ओझरला या शाळेतून अळ्या किडेयुक्त पोषण धान्य विद्यार्थांना वाटप…जाब विचारल्यानंतर मुख्याध्यापकांची अरेरावी ( बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011