इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाला उधाण आले आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ही भेट असल्यामुळे त्यामागे नेमकं काय कारण याची सर्वांना उत्सुकता आहे. आरक्षणाच्या मुद्दयावर ही भेट असल्याचेही बोलले जात आहे.
शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीत त्यावर चर्चा झाली का हे अद्याप स्पष्ट नाही. कालच बारामती येथे जाहीर सभेतून भुजबळांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ते आज भेटीला गेले.