इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने झिंबाब्वेवर पाचव्या आणि अंतिम टी २० सामन्यात ४२ धावांनी विजय मिळवत ही मालिका ४-१ फरकाने जिंकली. भारतीय संघाने झिंबाब्वेला विजयासाठी १६८ धावांचे आव्हान दिले होते. पण, भारतीय गोलंदाजांसमोर झिंबाब्वेची डाव १८.३ ओव्हरमध्येच आवरला. त्यांना फक्त १२५ धावा करता आल्या.
या सामन्यात मुकेश कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच संजू सॅमसन याने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. कॅप्टन म्हणून शुबमन गिल याची ही पहिलीच मालिका होती. शुबमनने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवत भारताला युवा सहकाऱ्यांच्या मदतीने मालिका जिंकून दिली.