इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरात जाऊन तिथे वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आणि स्वच्छतेचा आढावा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. यावेळी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या ६५ एकर परिसराला भेट देऊन तिथे जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने महिला आणि पुरुषांसाठीची स्वच्छतागृह, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता तसेच शहरातील स्वच्छतेबाबत पाहणी केली.
या भागात प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला, त्यांना औषधे तसेच पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत अथवा नाही याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्राशेड मध्ये रांगेत उभे असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. या साऱ्यांनी शासनाने वारीसाठी केलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
या भागात प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांना औषधे तसेच पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत अथवा नाही याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्राशेड मध्ये रांगेत उभे असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. या साऱ्यांनी शासनाने वारीसाठी केलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
आमदार समाधान अवताडे यांच्या बुलेटवर बसून शहरात फेरफटका मारला, जागोजागी करण्यात आलेल्या सोयीसुविधा जाणून घेतल्या तसेच वारकरी बंधू भगिनींचे अभिवादन स्वीकारत त्यांचे म्हणणे जाणून घेतले.